Friday, September 12, 2008

औगस्ट सप्टेंबर वार्ता!

हा म्हणजे निरा सणाईचा काळ. वेगवेगळ्या देवाईले पुजणे, भरपूर ( पण शाकाहारी ...म्हनजे आप्लं व्हेज हो! ) खाणे अन् श्रावणाच्या निसर्गातील लीलाईचा आनंद लुटणे.

ह्या
काळातील अजुन एक अतिशय महत्वाची घटना म्हनजे एका महान मनुष्याचा जन्मदिन!( महान असे फ़क्त अस्मादिकांचे मत, जनतेले ते अजुनही पुरेसं पटलेलं दिसत न्हाई. असो.) जन्मदिन म्हणजेच बर्डे, तो यंदा लै धुमधडाक्यात साजरा झाला. धूमधडाका अशासाठी म्हणुन की नवी-कोरी-चकचकीत चार-चाकी घरी आली. Maruti Swift. (WagonR अन् Santro च्या भांडणात स्विफ्ट ची फावली.) लै वर्षाईचं एक स्वप्न पूर्ण झालं.

यंदा गणपतीचे येणे-जाणे पण मग Swift मधून झाले. बंगलोर मधे असताना बिचारे शेंगदाण्या-साखरे वर असायचे. आता thanks to मीरा, दीड दिवस मस्त मोदकाची treat असते. त्यामुळे गणपती अन् आमचं बी पोट थोडं जास्तच सुटायला लागलं आहे. बाप्पाला आणताना "गणपती बाप्पा मोरया" च्या गजराचा आनंद न्याराच, पण "पुढल्या वर्षी लवकर या " म्हणतांना मात्र जीवाची घालमेल होउन जाते!

तसच महालक्ष्मींचं. आजीकडे अकोल्याला माहौल असतो. गौरींच्या चेहर्यावरचं तेज, धूपा-दीपाचं अत्यंत प्रसन्न वातावरण, बच्च्या-बुच्च्यांची किलबील, अन् त्यात कोह्ळ्याच्या भाजीची अन् आम्बिलिची पंगत, अलभ्य-लाभ!

तं
असं आहे सगळं. बाकी सर्व क्षेम-कल्याण.


Song of the momemt
- Jinhe naaz hai - Rabbi

i remain.

3 Comments:

Blogger Prashant kharche said...

Awesome write up and congratulation.. Keep writing!

-Prashant

19 September, 2008 09:15  
Blogger Unknown said...

why webdings ??!!

26 September, 2008 10:21  
Blogger Unknown said...

ohh my bad .. the fonts were not supported

26 September, 2008 10:22  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home